जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | प्रा. रोशन पन्नालाल मावळे यांची भव्य फाउंडेशन, जयपूर यांच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या प्रतिष्ठेच्या ‘ग्लोबल डायमंड आयकॉन अवॉर्ड’साठी निवड करण्यात आली आहे. या पुरस्कार वितरणासोबतच आंतरराष्ट्रीय मैत्री संमेलनाचेही आयोजन करण्यात आले आहे.
फाउंडेशनच्या संचालिका डॉ. निशा माथुर आणि संचालक शैलेन्द्र माथुर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली. हा भव्य सोहळा ५ एप्रिल रोजी जयपूर येथे पार पडणार असून, देशभरातील अनेक मान्यवर, वरिष्ठ आयएएस व आयपीएस अधिकारी तसेच विविध क्षेत्रातील प्रतिष्ठित व्यक्तींची उपस्थिती अपेक्षित आहे.

प्रा. रोशन मावळे यांनी शैक्षणिक क्षेत्रात केलेले उल्लेखनीय कार्य, संशोधनातील योगदान आणि सामाजिक कल्याणासाठी राबविलेल्या विविध उपक्रमांची दखल घेऊन त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. त्यांच्या प्रयत्नांमुळे शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात सकारात्मक बदल घडून आले असून, विद्यार्थ्यांसह समाजातील विविध घटकांना त्याचा लाभ झाला आहे. या सन्मानामुळे त्यांच्या कार्याला राष्ट्रीय स्तरावर गौरव मिळणार असून, त्यांच्या या यशाबद्दल शैक्षणिक, सामाजिक आणि विविध क्षेत्रांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.



