प्रा. आर. पी. महाजन यांना पीएचडी प्रदान

अमळनेर – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील कळमसरे येथील रहीवासी शिरपूर येथे वरिष्ठ महाविद्यालयात व्याख्याता म्हणून  कार्यरत असलेले प्रा. आर. पी. महाजन यांना नुकतीच गणित विभागात पीचडी प्रदान करण्यात आली.

 

शिरपूर येथील आर. सी. पटेल कला, वाणिज्य, विज्ञान महाविद्यालयातील गणित विभाग प्रमुख प्रा. आर. पी. महाजन यांना कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागातर्फे पीएचडी प्रदान करण्यात आली. प्रा. आर. पी. महाजन  यांनी सम पोब्लेम्स इन द थेयरी ऑफ फ्र्याकशनल इंटीग्रोडीफरनशीयल इकवेशंस विथ नॉन लोकल कंडिशन्स या  विषयावर शोध प्रबंध सादर केला. त्यांना स्कुल ऑफ म्याथेमॅ्टिकल सायन्स क. ब. चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे डॉ. एच. एल. तिडके यांचे मार्गदर्शन लाभले. डॉ. श्रीकांत चौधरी, विभाग प्रमुख डॉ. किशोर पवार, डॉ. सी. टी. आगे, यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

डॉ. महाजन कळमसरेचे

डॉ. रघुनाथ पंढरीनाथ महाजन हे कळमसरे येथील रहीवासी असून त्यांनी अगदी खडतर परिस्थितीत शिक्षण घेऊन नाव लौकिक मिळवले आहे. ते शिरपूर येथे वरिष्ठ महाविद्यालयात व्याख्याता म्हणून  कार्यरत आहेत.

त्यांना नुकतीच  गणित विषयात पीएचडी मिळाली असल्याने माजी शिक्षण मंत्री अमरीशभाई पटेल, संस्थेचे अध्यक्ष भूपेश भाई पटेल, उपाध्यक्ष राजगोपल भंडारी, सचिव प्रभाकर चव्हाण, माजी कुलगुरू के. बी पाटील, प्राचार्य डॉ. डी. आर. पाटील, उपप्राचार्य डॉ. पाटील, डॉ. आर. डी. जाधव सर्व सहयोगी प्राध्यापक परिवार, खान्देश माळी महासंघाचे संस्थापक अध्यक्ष मुरलीधर महाजन, अशोक चौधरी, मुरलीधर चौधरी, झुलाल चौधरी,प्रेमराज महाजन, प्रा. सुरेश महाजन, ए. एन. महाजन सर, जी. आर. चौधरी सर, अरुण चौधरी, विकास महाजन, डॉ. प्रा. संजय महाजन,  गणेश चौधरी, बाबुलाल पाटील, प्रा. हिरालाल पाटील,  नथु चौधरी, विकास पाटील,  संजय चौधरी, सुदाम चौधरी, हिरालाल महाजन, जितेंद्र महाजन, कैलास महाजन,  धुळे येथील प्रा. संजय महाजन, चुनीलाल महाजन, हेमंत चौधरी, संजीव महाजन, नितीन चौधरी, भरत महाजन, घनश्याम महाजन,जितेंद्र महाजन आदी समाज बांधवानी त्यांचे अभिनंदन केले आहे.

 

Protected Content