Home Cities जळगाव प्रा. डॉ. हर्षल तारे यांना ‘डबल डॉक्टरेट’; एमजीएम विद्यापीठातून दुसरी पीएच.डी

प्रा. डॉ. हर्षल तारे यांना ‘डबल डॉक्टरेट’; एमजीएम विद्यापीठातून दुसरी पीएच.डी

0
221

जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरासाठी अभिमानास्पद अशी बातमी समोर आली आहे. जगप्रसिद्ध सायंटिफिक रायटिंग कंपनीचे मानद संचालक आणि प्राचार्य प्रा. डॉ. हर्षल तारे यांना छत्रपती संभाजीनगर येथील एमजीएम विद्यापीठातर्फे नुकतीच दुसरी पीएच.डी. (Ph.D.) पदवी प्रदान करण्यात आली आहे.

प्रा. डॉ. तारे यांनी मॅनेजमेंट अँड कॉमर्स (व्यवस्थापन आणि वाणिज्य) या शाखेतून ‘इको फ्रेंडली मार्केटिंग: ग्राहकांवर होणारा परिणाम’ या महत्त्वपूर्ण विषयावर आपला शोधप्रबंध सादर केला. त्यांना विद्यापीठाचे कुलसचिव प्रा. डॉ. आशिष गाडेकर यांचे मार्गदर्शन लाभले.

दुसऱ्यांदा पीएच.डी. पदवी
प्रा. डॉ. तारे यांनी यापूर्वी विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून पीएच.डी. पदवी प्राप्त केली आहे. आता व्यवस्थापन क्षेत्रात दुसरी डॉक्टरेट पदवी मिळाल्याने, ते ‘डबल डॉक्टरेट’ धारक बनले असून, त्यांचे शैक्षणिक क्षेत्रातून सर्वत्र अभिनंदन होत आहे.

त्यांच्या या संशोधन कार्याची व्याप्ती खूप मोठी आहे. त्यांनी आपल्या संशोधन कार्यकाळात आतापर्यंत २७ पुस्तके, १०९ शोधनिबंध आणि २ पेटंट्स प्रकाशित केले आहेत. या उत्तम कामगिरीबद्दल त्यांना यापूर्वी “इमर्जिंग सायंटिस्ट” (Emerging Scientist) या प्रतिष्ठेच्या पुरस्कारानेही गौरविण्यात आले आहे.

संशोधनातील सहकार्य
आपल्या दुसऱ्या पीएच.डी.च्या सखोल संशोधन कार्यकाळात डॉ. तारे यांना प्रा. डॉ. पूजा देशमुख, प्रा. डॉ. भागबत बारीक आणि प्रा. डॉ. किर्तीकुमार एखंडे यांचे मोलाचे सहकार्य आणि मार्गदर्शन लाभले. तसेच, महाराष्ट्राच्या सहा जिल्ह्यांतील ग्राहक आणि विविध क्षेत्रांतील कंपन्यांकडून माहिती संकलन करण्यासाठी प्रा. गायत्री बारी, लंकेश पावरा आणि सौरव घुगे यांनी महत्त्वाचे योगदान दिले.

डॉ. तारे यांना डबल डॉक्टरेट मिळाल्याबद्दल एमजीएम विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. विलास सपकाळ, कुलसचिव प्रा. डॉ. आशिष गाडेकर आणि अन्य मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले असून, विज्ञान-तंत्रज्ञान व व्यवस्थापन-वाणिज्य या दोन्ही क्षेत्रांतील पुढील संशोधनासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.


Protected Content

Play sound