जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | जामनेर शहरापासून काही अंतरावर भुसावळ रोडवर असलेल्या गुरुदेव सेवा आश्रम ट्रस्ट या ठिकाणी सुंदर असे मंदिर बांधण्यात आले असून या मंदिरामध्ये 29 जानेवारी ते 2 फेब्रुवारी पर्यंत मूर्ती प्राणप्रतिष्ठा विष्णू महाजन संत संमेलन यांच्यासह विविध संतांचे प्रवचन सत्संग असे कार्यक्रम चार दिवस चालणार असून आज पहिल्या दिवशी जामनेर शहरातून भव्य अशी शोभायात्रा काढण्यात आली.
या शोभा यात्रेमध्ये एका ट्रॅक्टरवर भगवान श्रीकृष्ण राधा महादेव रामदेवजी बाबा यांच्या मूर्त्या विराजमान करण्यात आल्या होत्या तर बग्गीमध्ये महामंडलेश्वर जनार्दन स्वामी व पाल येथील गादीपती संत गोपालजी महाराज हे संतही रॅली सामील झाले. रॅलीत महिला सह मोठ्या प्रमाणावर सर्व समाज बांधव या रॅलीत उपस्थित होते. रॅली बाबाजी राघव मंगल कार्यालय येथे गुरुदेव सेवा आश्रम ट्रस्ट दरम्यान करण्यात आली व त्यानंतर संतांचे आशीर्वाद पर प्रवचन झाले व संतांच्या हस्ते ध्वजारोहण करून समारोप करण्यात आला.