पारोळा प्रतिनिधी । तालुक्यातील वसंतनगर येथील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळेत सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त गावातून मिरवणूक काढण्यात आली व डोक्यावर फेटे असलेल्या विद्यार्थ्यांनी लेझीम खेळून ग्रामस्थांचे लक्ष वेधून घेतले.
यावेळी इयत्ता आठवीची विद्यार्थिनी रोशनी जाधव हीने सावित्रीबाई यांची प्रतिकृती साकारली होती. याप्रसंगी गावात ढोल ताशा याच्या गजरात घोड्यावर सावित्रीबाई यांचा देखावा सादर करून मिरवणूक काढण्यात आली. सर्व विद्यार्थिनीनी साडी परिधान करून डोक्यावर फेटा बांधित लेझिम खेळीत शोभायात्रा काढण्यात आली होती. यामुळे गावातील ग्रामस्थ महिला यांचे साडी नेसलेल्या विद्यार्थिनीनी डोक्यावर फेटा यामुळे लक्ष वेधुन घेतले होते.
यानंतर शाळेच्या पटाँगनात सावित्री बाई यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी गावातील जेष्ठ संतोष जाधव, अभेराम जाधव, आत्माराम जाधव, मनोज जाधव, पोलीस पाटील विलास जाधव, हुकुम जाधव, सुभाष जाधव, देवीदास जाधव, जोगिलाल जाधव प्राथमिक मुख्याध्यापक सोपान पाटील, माध्यमिक मुख्याध्यापक सी के पोतदार, एस. जे. भामरे आदींची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पी.एच.निकुंभे तर आभार प्रा.हिरालाल पाटील यांनी मानले.