Home Cities अमळनेर न्यू व्हिजन स्कूलमध्ये पारितोषीक वितरण

न्यू व्हिजन स्कूलमध्ये पारितोषीक वितरण

0
69

अमळनेर प्रतिनिधी । येथील न्यू व्हीजन स्कूल येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहणासोबत पारितोषीक वितरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

प्रारंभी ज्येष्ठ पत्रकार तथा, देशदूतचे तालुका प्रतिनिधी राजेंद्र पोतदार यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्याप्रसंगी चेअरमन निलेश लांडगे, सुखदेव गुरुजी, बोरसे सर, मुख्याध्यापक संदीप महाजन, उपमुख्याध्यापिका माधुरी महाजन आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाप्रसंगी शाळेतील विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी देशभक्तीपर गीत गायन करून भारतीय ध्वजाला मानवंदना दिली. तसेच विविध भाषणाचे आयोजन करण्यात आले होते. त्याचप्रमाणे आनंद मेळाव्यातील विद्यार्थ्यांना बक्षीस वितरित करण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन फरीन शेख ,कल्पना कोरणी, सुरेखा सैंदाणे यांनी केले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नीता जाधव, दिपाली पाटील, वंदना मराठे, राजश्री चौधरी, योगिनी ओवे, रितिका मार्कंडेय, सोनाली पाटील, दिपाली राजपूत,स्वाती महाजन, विद्या महाले, सुरभी सोनवणे ,शितल निकम, , हेमांगी काळकर, पूजा महाजन, वर्षा पाटील, कविता शिसोदे, वंदना शाह, किरण सोनार, क्रीडा शिक्षक सॅम शिंगाने, कलाशिक्षक, तसेच शाळेचे शिक्षकेतर कर्मचारी अनिता पाटील, मीना पाटील, माधुरी सोनार, माधुरी बाळापुरे, वंदना सोनार, प्रतिभा पाटील, दिपाली सोनार, रमेश नाना,पंढरीनाथ बाबा यांनी सहकार्य केले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound