फैजपूर –लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । तापी परिसर विद्या मंडळ संचलित धनाजी नाना महाविद्यालयातील रसायनशास्त्र विभागाने आयोजित लोकसेवक मधुकरराव चौधरी केमिस्ट्री ऍप्टिट्यूड टेस्ट 2025-26 चे पारितोषिक वितरण समारंभ 11 मार्च 2026 रोजी यशस्वीरित्या संपन्न झाला. या परीक्षेत एकूण 25 महाविद्यालतील 337 विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग नोंदविला. कार्यक्रमाचे अध्यक्ष तापी परिसर विद्या मंडळाचे उपाध्यक्ष प्रा. डॉ. एस. के. चौधरी यांना भूषविले, तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. डॉ. गुणवंत हरी सोनवणे, चेअरमन-रसायनशास्त्र अभ्यास मंडळ, क.ब. चौ.उ.म.वि. जळगाव उपस्थित होते.
समारंभात तापी परिसर विद्या मंडळाचे चेअरमन लीलाधर विश्वनाथ चौधरी, सचिव मुरलीधर टी. फिरके, सहसचिव नंदकुमार आसाराम भंगाळे, कार्यकारी सदस्य माजी प्राचार्य डॉ. एस.एस. पाटील, मा. श्री. संजय दादा चौधरी तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेंद्र बी. वाघुळदे, उपप्राचार्य प्रा. एम. झेड. सुरवाडे आणि प्रा. कल्पना पाटील उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. पल्लवी भंगाळे आणि प्रा. नाहीदा कुरेशी यांनी केले, तर प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय डॉ. योगेश तायडे यांनी करून दिला.

कार्यक्रमादरम्यान कु. नंदा आनंदा बाविस्कर (श्री. वि. एस. नाईक कॉलेज, रावेर) यांनी परीक्षेचे महत्त्व अधोरेखित केले, तसेच डॉ. जयंत प्रल्हाद नेहेते (सरदार वल्लभभाई पटेल कॉलेज, ऐनपुर) यांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या मूल्यांकनासाठी स्वावलंबी राहण्याचा संदेश दिला. प्रमुख पाहुणे प्रा. गुणवंत सोनवणे यांनी रसायनशास्त्र विषय हा रोजगारनिर्मिती करणारा असल्याचे सांगितले आणि विद्यार्थ्यांचे प्रोत्साहन केले.
यावर्षीच्या LMCCAT-2026 परीक्षेत देशात प्रथम क्रमांक साहिल बापूराव पाटील (आर. एल. कॉलेज, पारोळा), द्वितीय क्रमांक कु. रुपेश गंगाधर पाटील (सि. गो. पाटील कॉलेज, साक्री) आणि तृतीय क्रमांक कु. वैष्णवी गजानन मोलगे (आर. डी. आर. के. कॉलेज, बडनेरा, जिल्हा अमरावती) यांना मिळाले. उपाध्यक्ष प्रा. एस. के. चौधरी यांनी सांगितले की, LMC CAT परीक्षेचा अनुभव राष्ट्रीय स्तरावर होणाऱ्या स्पर्धा परीक्षेत विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढविण्यास उपयुक्त ठरेल.
कार्यक्रमाच्या शेवटी प्रा. शेरसिंग पाडवी यांनी उपस्थितांचे आभार मानले आणि प्रा. ए. के. पाटील, डॉ. राकेश तळेले, डॉ. हरीश तळले, डॉ. मच्छिन्द्र पाटील, प्रा. अचल भोगे, प्रा. विकास वाघुळदे, निलेश पाटील, हंशाली पाटील, चैताली पाटील, सुजित भाट, पूजा महाजन, जितेंद्र चौधरी, अरुण सैंदाणे आणि सिद्धार्थ तायडे यांच्या परिश्रमांचे विशेष कौतुक केले.



