Home राजकीय विद्यार्थ्यांवरील लाठिमाराच्या निषेधार्थ प्रियंका गांधींचे धरणे आंदोलन

विद्यार्थ्यांवरील लाठिमाराच्या निषेधार्थ प्रियंका गांधींचे धरणे आंदोलन


EL50C4jUUAEYnVQ
 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठातील विद्यार्थ्यांवर करण्यात आलेला लाठिमार आणि महिला अत्याचाराविरोधात काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांनी इंडिया गेटवर धरणे आंदोलन सुरू केले आहे. आज सांयकाळी ६ वाजेपर्यंत हे धरणे आंदोलन सुरू राहमार आहे.

 

जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठात गेल्या तीन दिवसांपासून दिल्लीत विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू असून त्याची केंद्र सरकारने दखल न घेतलेली नाही. या आंदोलनाच्या वेळी विद्यार्थींनींना मारहाणही करण्यात आली. पोलिसांनी लाठिमार करतानाच अश्रूधुराचे नळकांड्याही फोडल्या. त्यामुळे देशभरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. या सगळ्या गोष्टीच्या निषेधार्थ निषेधार्थ प्रियंका गांधी यांनी इंडिया गेटवर धरणे आंदोलन सुरू केले आहे. या धरणे आंदोलनात महिला मोठ्या प्रमाणावर सहभागी झाल्या आहेत.


Protected Content

Play sound