Home राजकीय प्रियंका गांधी यांची राजकारणात एंट्री !

प्रियंका गांधी यांची राजकारणात एंट्री !

0
46

नवी दिल्ली वृत्तसंस्था । उत्तर प्रदेशच्या काँग्रेसच्या प्रभारीपदी प्रियंका गांधी यांची नियुक्ती करण्यात आली असून या माध्यमातून आता त्यांचा राजकारणात अधिकृत प्रवेश झाला आहे.

गत अनेक वर्षांपासून प्रियंका गांधी या राजकारणात सक्रीय होणार असल्याचे वृत्त होते. याबाबत अनेकदा वावड्यादेखील उठल्या होत्या. तथापि, याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आली नव्हती. आता मात्र प्रियंका गांधी यांची उत्तरप्रदेशच्या प्रभारी म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांना खास करून पूर्व उत्तरप्रदेशची धुरा सोपविण्यात आली आहे. यासाठी त्यांना एआयसीसीच्या सरचिटणीसपदाची अतिरिक्त जबाबदारीदेखील देण्यात आलेली आहे. यामुळे आता प्रियंका गांधी यांचा राजकारणात अधिकृत प्रवेश झाल्याचे मानले जात आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound