Home क्राईम खासगी कंपनीच्या मॅनेजरला जीवे मारण्याची धमकी देऊन लुटले; एकाला अटक

खासगी कंपनीच्या मॅनेजरला जीवे मारण्याची धमकी देऊन लुटले; एकाला अटक


भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ शहरातील दिपनगर परिसरात एका खाजगी कंपनीच्या मॅनेजरला भररस्त्यात गाठून, शिवीगाळ करत आणि जीवे मारण्याची धमकी देऊन १० हजार रुपयांची रोकड लुटल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी भुसावळ तालुका पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयित आरोपीला अटक केली आहे.

अधिक माहिती अशी की, राजेश श्रीराम साबळे (वय ५२, रा. दिपनगर) हे एका कंपनीत मॅनेजर म्हणून कार्यरत आहेत. बुधवारी १ एप्रिल रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास, दिपनगर येथील इलेक्ट्रिक मेंटेनन्स ऑफिससमोरील सार्वजनिक ठिकाणी संशयित आरेपी सम्राटकुमार सुरेश बनसोडे (रा. फेकरी, ता. भुसावळ) याने राजेश साबळे यांना अडविले. त्यावेळी विनाकारण शिवीगाळ करत साबळे यांना जीवे मारण्याची धमकी दिली. या दहशतीच्या वातावरणात आरोपीने फिर्यादींच्या खिशातील १० हजार रुपये जबरीने हिसकावून घेतले आणि तिथून पळ काढला.

या घटनेनंतर राजेश साबळे यांनी तातडीने भुसावळ तालुका पोलीस स्टेशन गाठून तक्रार दिली. त्यानुसार भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल होताच संशयित आरोपीला पोलीसांनी अटक केली. पोहेकॉ महेश चौधरी हे करीत आहे


Protected Content

Play sound