आंतरवाली सराटी-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. यातच नेते मंडळीच्या गाठीभेटी वाढल्या आहेत. त्यातच आता विधानसभा निवडणुकीत मराठा आंदोलनाचा फायदा महाविकास आघाडीला होईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. त्यातच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी आंतरवाली सराटीमध्ये जाऊन मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली.
पृथ्वीराज चव्हाण आणि मनोज जरांगे पाटील यांच्यात आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. तसेच पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात मराठा समाजाला दिलेल्या आरक्षणासंदर्भात देखील या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. संदर्भातल्या घोषणेपूर्वीच पृथ्वीराज चव्हाण आणि मनोज जरांगे पाटील यांची राजकीय भेट झाल्याने राज्याच्या राजकारणात याची चर्चा सुरू झाली आहे.