इचलकरंजी (वि.प्र) येथील उत्तम प्रकाश चित्रमंदिर येथे फर्ज फाऊंडेशन कराड यांच्या वतीने डॉ.सरोजिनी बाबर यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त प्रेरणा पुरस्कार वितरण सोहळा नुकताच संपन्न झाला. यावेळी माई बाल विद्या मंदिराच्या उपक्रमशील मुख्याध्यापिका शैला कांबरे यांना साहित्यिक अनुपमा उजगरे, सूर्यकांत मालुसरे यांच्या हस्ते प्रेरणा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
शैला कांबरे या गेली २० वर्षे अध्यापनाचे कार्य व ५ वर्षे मुख्याध्यापिका म्हणून उत्कृष्ठ पणे कार्य करत आहेत.शाळेत विविध उपक्रम राबवण्यासाठी त्या सतत धडपडत असतात. तसेच आविष्कार फाऊंडेशन च्या कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्षा व ज्ञानेश्वर मुळे फाऊंडेशन (कोल्हापूर)च्या उपाध्यक्षा म्हणून सामाजिक कार्यात सक्रिय सहभागी आहेत.या यशा बद्दल माई महिला मंडळ व माई बाल विद्या मंदिर च्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास नितीन कोकणे,संतोष पाटील उपस्थित होते.संयोजक पी. एल. हणबर, फरझाना इकबाल यांनी परिश्रम घेतले.