प्राचार्य डॉ. देशमुख यांना सहसंचालकांकडून दुसऱ्यांदा नोटीस

 

जळगाव, प्रतिनिधी | दोन महिन्यांपूर्वी शहरातील नूतन मराठा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एल.पी. देशमुख यांनी कर्मचाऱ्यांना हाताशी धरून अनधिकृतपणे महाविद्यालय बंद केले होते. तसेच जमावबंदी कायद्याचे उल्लंघन केले होते. या प्रकारणी सहसंचालक कार्यालयाने प्राचार्य देशमुख यांना काही दिवसांपूर्वी नोटीसही बजावली होती. पण त्या नोटीसीचे कुठलेही उत्तर प्राचार्यांनी सहसंचालकांना दिले नाही, म्हणून आज पुन्हा प्राचार्य देशमुख यांना सहसंचालक कार्यालयाने स्मरणपत्र क्रमांक दोनची नोटीस बजावली आहे.

 

या अनधिकृत बंदची तक्रार नूतन मराठा महाविद्यालयाचे सचिव (यु.आर.) पियुष नरेंद्र पाटील, अजिंक्य पाटील, नयन खडके, भावेश चौधरी, सोज्वल पाटील आदिंनी सहसंचालक यांच्याकडे केली होती. त्यावेळी त्यांनी आंदोलन करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा ‘त्या’ दिवसाचा पगार कापण्याची व करवाईची मागणी सहसंचालक यांच्याकड़े केली होती. त्यामुळे देशमुख यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

Protected Content