
मुक्ताईनगर (प्रतिनिधी) 57 वे अखिल भारतीय अंकुर साहित्य संमेलन दि 6 व 7 जून 2019 रोजी मुक्ताईनगर येथे होणार आहे. सदर संमेलनाच्या अध्यक्षपदी सर्जनशील लेखक,कवी, समीक्षक, प्राचार्य डॉ. किसन पाटील यांची निवड झालेली आहे. सदर संमेलनाचे उद्घाटन माजी महसुल मंत्री महाराष्ट्र एकनाथराव खडसे यांच्या हस्ते होणार आहे. तर स्वागताध्यक्ष म्हणून खासदार श्रीमती रक्षाताई खडसे या कार्यक्रमाला उपस्थीत राहणार आहेत.
अंकुर साहित्य संघाने गत 32 वर्षात महाराष्ट्रातील पुरोगामी साहित्य चळवळीत स्थान प्राप्त केलेले आहे. अनेक साहित्य प्रवाहांचे अंकुर साहित्य चळवळीत एकत्रीकरण झालेल आहे. आता पर्यंत 56 अंकुर मराठी साहित्य संमेलन आयोजीत झालेली आहेत. अंकुर साहित्य संघ महाराष्ट्र आणि शिवचरण उज्जैनकर फाऊंढेशन यांच्या संयुक्त विद्यमाने मुक्ताईनगरात दोन दिवस चालणाऱ्या या संमेलनात परिसंवाद, कविसंमेलन, कथाकथन, गझल मुशायरा यांचे आयोजन केले असून साहित्यिक व रसिक यांना आगळी वेगळी मेजवानी ठरणार आहे.