पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा २५ ऑगस्ट रोजी जिल्हा दौरा

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दोऱ्यानंतर २५ ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जळगाव जिल्हा दौऱ्यावर येणार असून जळगाव विमानतळ समोरील भव्य प्रांगणात सभेचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती मंत्री गिरीश महाजन यांनी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेच्या जागेची मंत्री गिरीश महाजन यांनी मंगळवारी १३ ऑगस्ट रोजी दुपारी १ वाजता पाहणी केली त्यावेळी ते माध्यमांशी बोलत होते.

जळगाव शहरातील सागर पार्क येथे मंगळवारी १३ ऑगस्ट रोजी दुपारी २ वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थिती सभा घेण्यात आली. मुख्यमंत्री यांच्या जिल्हा दौऱ्यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील २५ ऑगस्ट रोजी जळगाव जिल्हा दौऱ्यावर येणार असून त्यांची जाहीर सभा ही जळगाव विमानतळा समोरील भव्य प्रांगणात होणार आहे. या अनुषंगाने मंगळवारी १३ ऑगस्ट रोजी दुपारी १ वाजता मंत्री गिरीश महाजन, आमदार राजूमामा भोळे, आमदार मंगेश चव्हाण, आमदार संजय सावकारे, पोलीस अधिक्षक महेश्वर रेड्डी यांनी जागेची पाहणी केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेला जळगाव जिल्ह्यातून लाखो महिला भगिनी उपस्थित राहणार असल्याची माहिती देखील मंत्री गिरीश महाजन यांनी माध्यमांशी बोलतांना दिली आहे.

Protected Content