अहमदाबाद (वृत्तसंस्था) लोकसभा मतदानाच्या तिसऱ्या टप्प्यात देशाच्या १३ राज्ये आणि दोन केंद्रशासित प्रदेशातील ११७ मतदारसंघांत मतदान सुरु झालेय. आज सकाळी अहमदाबादमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मतदानाचा हक्क बजावला.
मतदान करून बाहेर आल्यानंतर मोदी म्हणाले की, लोकशाहीच्या उत्साहात मी सामील झालोय. त्याच पद्धतीने देशातील प्रत्येक नागरिकाने मतदानाचा हक्क बजवावा. मोदींनी यावेळी नवमतदारांना पहिल्या मतदानाच्या शुभेच्छा दिल्यात. तत्पूर्वी मोदी यांनी आपल्या मातोश्रींचा आशीर्वाद घेत मतदानाला निघाले होते. तिसऱ्या टप्प्यात भाजपचे अध्यक्ष अमित शहा, काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी समाजवादी पक्षाचे संस्थापक मुलायम सिंह यादव, पीडीपीच्या मेहबुबा मुफ्ती, शशी थरुर, जयाप्रदा, मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह केंद्रीय मंत्री सदानंद गौडा, श्रीपाद नाईक, वरुण गांधी, संबित पात्रा, महाराष्ट्र भाजपचे अध्यक्ष रावसाहेब दानवे, अनंत गीते आदी बड्या नेत्यांचे भवितव्य आज, मंगळवारी ईव्हीएम यंत्रात बंद होणार आहे.