नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंड्स न्युज वृत्तसेवा | आगामी लोकसभा निवडणूक देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा वाराणसीतून लढणार आहेत. ते सध्या वाराणसीचे खासदार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यापूर्वी ही २०१४ व २०१९ च्या लोकसभा निवडणूकीत वाराणसीतूनच निवडून लोकसभेला गेले होते.
भाजप आज २ मार्च रोजी आपल्या पहिल्या लोकसभा निवडणूकीच्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. या यादीत ३४ पहिल्या यादीत केंद्रीय आणि राज्यमंत्र्यांचा समावेश आहे. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनाही तिकीट देण्यात आलं आहे. यावेळी २८ महिलांना यावेळी लोकसभेचं तिकीट देण्यात आली आहे. भाजपचे महासचिव विनोद तावडे यांनी ही घोषणा केली.