वायनाड-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | वायनाड जिल्ह्यातील काही गावांमध्ये ३० जुलै रोजी भीषण भूस्खलनाची घटना घडली होती. या दुर्घटनेत ३०० पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला होता. तर शेकडो नागरिक जखमी झाले होते. दरम्यान, या घटनेनंतर आता पंतप्रधान मोदी यांनी केरळमध्ये पोहोचत भूस्खनल प्रभावित क्षेत्रांची पाहणी केली आहे.
पंतप्रधान मोदी आज केरळ दौऱ्यावर असून यावेळी त्यांनी भूस्खलन प्रभावित क्षेत्रांची पाहणी केली आहे. त्यानंतर ते नागरिकांच्या पूर्नवसनासंदर्भातील परिस्थितीचा देखील आढावा घेणार आहेत. याशिवाय रुग्णालयात दाखल जखमी नागरिकांची भेट घेणार असून भूस्खलन प्रभावित राहत असलेल्या निर्वासित छावण्यांनाही भेट देणार असल्याची माहिती आहे.
महत्त्वाचे म्हणजे या भेटीनंतर पंतप्रधान मोदी संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेणार असल्याचेही सांगितले जात आहे. दरम्यान, केरळच्या वायनाड जिल्ह्यामध्ये ३० जुलै रोजी भूस्खलनाची घटना घडली होती. या घटनेत मोठ्या प्रमाणावर वित्त आणि जीवितहानी झाली होती. तसेच या भूस्खलनात ३०० पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला होता. तर अनेक जण गंभीर जखमी झाले होते. ही आपत्ती घडल्यानंतर लष्कराच्या तुकड्या, राष्ट्रीय आपत्ती निवारण निधी, तटरक्षक दल, नौदल यांच्याकडून तातडीने बचाव आणि मदतकार्य सुरू करण्यात होते. तसेच पंतप्रधान मोदी यांनीही केरळला सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिलं होतं.