पारोळा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पारोळा शहरात संशयास्पद फिरणाऱ्या २० जणांवर पोलीसांनी कारवाई करत ताब्यात घेतले असून त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे.
पारोळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे यांचे मार्गदर्शनाखाली अचानक पारोळा शहरात कोमिंग ऑपरेशन राबविले. यात संशयास्पदरित्या फिरणारे एकूण २० जणांना ताब्यात घेतले आहे. यात तीलीचंद कपूर येदानी वय 25 वर्ष, कपूर हरी येदानी वय 52 वर्ष, अतिश कपूर येदानी वय 23वर्ष, मधू गोविंद भूरानी वय 44 वर्ष, विकास दादू भुरानी वय 23वर्ष, नितेश कपूर येदानी वय 19 वर्ष, मिलिंद लटार पवार वय 48 वर्ष, आकाश दादू भूरानि वय 32 वर्ष , सागर मिलिंद पवार वय 19 वर्ष, अमर मिलिंद पवार वय 22 वर्ष, बादल दादू भुरानि वय 20 वर्ष, देवलाल गणलाल चव्हाण, गेंदलाल उदल चव्हाण वय 46 वर्ष, चेनगिर दौलतगिर चव्हाण वय 52 वर्ष, सागर चेनगिर चव्हाण वय 22 वर्ष, शेखर चेनगिर चव्हाण वय 21 वर्ष , नरेश कचरू पवार वय. 29 वर्ष, मिलिंद कचरू पवार वय 30 वर्ष, कचरू भैयाजी पवार आणि हरपोष देवरा सोळंकी वय 42 वर्ष सर्व राहणार जामगढ ता. काटोल जिल्हा नागपूर यांना ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी केली असता त्यांच्याकडून समाधानकारक उत्तरे मिळाली नाही. सर्वांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे.
ही कारवाई पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि राजू जाधव, पोउनि शिंदे,पोहेकॉ मराठे, पो कॉ किशोर भोई, पो कॉ आशिष गायकवाड, पोकॉ अभिजित पाटील, पो कॉ राहुल पाटील, पोकॉ हेमचंद्र साबे यांनी केली.