यावल प्रतिनिधी | आदिवासी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान आणि आदिवासी विभागामार्फत होणाऱ्या गरीब आदिवासी विद्यार्थ्यांची पिळवणूक रोखण्यासंदर्भात एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यावल येथे प्रकल्प अधिकारी विनिता सोनवणे यांना निवेदन देण्यात आले.
या निवेदनात आदिवासी होस्टेल यावल व आदिवासी होस्टेल जळगावच्या पिण्याचे पाण्याची समस्या, झोपण्यासाठी बेड, गादी, चादरी उपलब्ध नसल्याचं नमूद करण्यात आलं आहे. यासह हॉस्टेलात वाचनालय, पुस्तक परिपूर्ण असावेत आणि नेहमीच वृत्तपत्रे वाचण्यास मिळावेत, शाररिक विकासासाठी उपाययोजना करण्यात याव्यात. डीबीडी विद्यार्थ्यांच्या खात्यावर लवकरात लवकर जमा करण्यात यावी. पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयं योजनेचे लाभ शंभर टक्के मिळावेत. नवीन हॉस्टेल इमारत जळगाव येथील काम लवकरात लवकर पूर्ण करून तेथे विद्यार्थ्यांना राहायला मिळावं. आदिवासी विद्यार्थ्यांनी हॉस्पिटलसाठी अर्ज केले आहेत. पहिल्या टप्प्यातील विद्यार्थ्यांना प्रवेश घेतला आहे परंतु विद्यार्थ्यांच्या समस्या लक्षात घेत विद्यार्थ्यांच्या वस्तीगृहात शंभर टक्के कोटा व्यतिरिक्त २५ टक्के कोटा अधिक क्षमतेने वाढवून मिळावा जेणेकरून आदिवासी विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार नाही यासह विविध विषयांवर निवेदन देण्यात आले.
शासनाने दिलेल्या निर्देशानुसार सर २०२१/२२ मध्ये शाळा महाविद्यालय खुली करण्यात आलेली आहेत. शाळा महाविद्यालयात विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढत असून निमित्त व्याख्यान सुरू झाले आहेत. आदिवासी वस्तीगृह यामध्ये अनेक विद्यार्थी यांना प्रवेश मिळालेला असून राहण्यास मनाई केली जाते. शासनाकडून पंडित दीनदयाल उपाध्याय योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांच्या खात्यावर डीबीटीही दिली जाते. स्टेशनरी व मेसेज केले जाते परंतु तीसुद्धा आतापर्यंत विद्यार्थ्यांच्या खात्यावर जमा झालेली नाही.
आदिवासी वस्तीगृह यांच्या अधीक्षकांना विचारणा केली असता त्यांच्याकडे आदिवासी विद्यार्थ्यांसाठी सकारात्मक उत्तर मिळत नाही. “आमच्याकडून योग्य पाठपुरावा झाला असून वरिष्ठ पातळीवर काम पेंडिंग आहे” असं ते सांगतात. त्या अनुषंगाने आज निवेदन देण्यात आले. आदिवासी प्रकल्प अधिकारी यांनी विद्यार्थ्यांच्या समस्या लवकरात लवकर सोडवाव्यात आणि विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान थांबवावे असे निवेदनात नमूद केले आहे.
निवेदनात नमूद केलेल्या समस्या लवकर मान्य न झाल्यास रीतसर परवानगी घेऊन कोरोनाच्या नियमांचे पालन करून जिल्हाधिकारी कार्यालय येथे उपोषण करण्यात येईल असा इशाराही या पत्रकात देण्यात आला आहे. आदिवासी तडवी भिल युवा कृती समिती यावल जिल्हा जळगाव यांच्यामार्फत यावल येथे यावेळी आदीवासी एकात्मीक विकास विभागाचे जिल्हा प्रकल्प अधिकारी विनिता सोनवणे यांना निवेदन देण्यात आले