धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील पायी जाणाऱ्या एका पुरोहिताला पोलीस इन्सपेक्टर असल्याची बतावणी करून हातातील ३० हजार रूपये किंमतीची सोन्याची अंगठी हातचालाखीने चोरून फसवणूक घटना समोर आली आहे. याप्रकरणी गुरूवारी १३ जुलै रोजी दुपारी २ वाजता धरणगाव पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला.
धरणगाव पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, किशोर पदमनाथ शुक्ला (वय-५५) रा. घोडे गल्ली, धरणगाव हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. पुरोहिताचे काम करून आपला उदरनिर्वाह करतात. बुधवार १२ जुलै रोजी दुपारी १२ वाता किशोर शुक्ल हे शहरातील महादेव मंदीर परिसरातून पायी जात असतांना एक अनोळखी व्यक्ती दुचाकीवर आला. आणि म्हणाला की, मी पोलीस निरीक्षक आहे. तुमच्या हातातील सोन्याची अंगठी रूमालात ठेवा असे सांगितले. त्यानंतर किशोर शुक्ल यांनी हातातील सोन्याची अंगठी काढून रूमालात ठेवली व त्यांच्या हातात दिली. त्यानंतर शुक्ला यांनी रूमाल उघडून न बघता घरी गेले. त्यावेळी रूमाला पाहिले असता सोन्याी अगठी दिसून आली नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर किशोर शुक्ला यांनी पोलीस ठाण्यात धााव घेवून तक्रार दिली. त्यानुसार गुरूवारी १३ जुलै रोजी धरणगाव पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस नाईक उमेश पाटील करीत आहे.