मुक्ताईनगर – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । शिवचरण उज्जैनकर फाऊंडेशन मुक्ताईनगर, महाराष्ट्र आणि प्रागतिक विचार मंच पणजी-गोवा यांच्या संयुक्त विद्यमाने पहिले अखिल भारतीय शिव मराठी साहित्य संमेलननिमित्त फोंडा येथील नवदुर्गा मंदिर प्रांगणात नुकतीच पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी व्यासपीठावर फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तथा संमेलनाचे मुख्य आयोजक डॉ.शिवचरण उज्जैनकर बुलढाणा जिल्हा दक्षता समितीचे प्रमुख शाहीर मनोहरराव पवार बुलढाणा जिल्हा विधी सल्लागार एडवोकेट विजयकुमार कस्तुरे संमेलनाचे संयोजक साहित्यिक प्रकाश तळवडेकर सहसंयोजक डॉ. अनिता तिळवें, कार्याध्यक्ष जयवंत अडपईकर, दुर्गाकुमार नावती, मंगलाताई उसगावकर आदी सर्व मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते. प्रसंगी फाउंडेशनच्यावतीने उपस्थित पत्रकार बंधु व मान्यवरांना आदिशक्ती संत मुक्ताईची प्रतिमा भेट देण्यात आली.
याप्रसंगी डॉ. उज्जैनकर यांनी ५ जून रोजी होणाऱ्या पहिल्या अखिल भारतीय शिव मराठी साहित्य संमेलनाच्या संदर्भात माहिती दिली त्यादिवशी सकाळी साडेसात वाजता ग्रंथदिंडीने या संमेलनाची सुरुवात त्यानंतर उद्घाटन सत्र मध्ये शिवचरण उज्जैनकर फाउंडेशन चे साहित्य पुरस्कार व इतर पुरस्कार वितरण पुस्तक प्रकाशन सोहळा मान्यवरांचे भाषण त्यानंतर दुपारी भजन आणि परिसंवाद परिसंवादाचे अध्यक्ष महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध वक्ता डॉ. शिवानंद भानुसे परिसंवादाचा विषय परिवर्तनवादी साहित्य चळवळींचे योगदान परिसंवादाचे सूत्रसंचालन का डॉ. अनिता तिळवे हे करतील त्यानंतर कथाकथनाचे अध्यक्ष गोवा येथील सुप्रसिद्ध कथाकार दयाराम पाडलोसकर नंतर गाणी बहिणाईची यावर जळगाव येथील प्रा. संध्या महाजन या बहिणाबाई चौधरी यांच्या गीतांचा कार्यक्रम सादर करतील त्यानंतर मराठी गीतांचा बहारदार कार्यक्रम यामध्ये गीतकार संगीतकार प्रा.जगदीश वेदपाठक, औरंगाबाद शाहीर मनोर पवार व मंडळी सादर करतील त्यानंतर संध्याकाळी पुन्हा भोजन आणि रात्री आठ ते दहा या वेळात कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आलेले आहे.
कवी संमेलनाचे अध्यक्ष राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक ज्येष्ठ बालसाहित्यिक कोल्हापूर येथील डॉ.मा.ग. गुरव हे असतील त्यामध्ये महाराष्ट्रातील व गोव्यातील विविध मान्यवर कवींचा समावेश आहे फोंडा येथील गोमंतक साहित्य सेवक मंडळाचे अध्यक्ष तथा अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे उपाध्यक्ष साहित्यिक रमेश वंसकर यांच्या नावाची उद्घाटक म्हणून घोषणा करण्यात आली. या संमेलनाला महाराष्ट्रातील शंभर साहित्यिक रसिकांची उपस्थिती लाभणार आहे, असेही या पत्रकार परिषदेत मुख्य आयोजक डॉ. शिवचरण उज्जैनकर व प्रागतिक विचार मंचचे अध्यक्ष तथा कार्याध्यक्ष संमेलनाचे कार्याध्यक्ष जयवंत अडपईकर यांनी सांगितले.
याप्रसंगी गोमंतक, तरुण भारत, लोकमत अशा विविध वर्तमानपत्राचे पत्रकार बंधू उपस्थित होते. प्रसंगी उज्जैनकर फाउंडेशनचे मागील वर्षाचे तापी- पूर्णा राज्यस्तरीय उत्कृष्ट साहित्य पुरस्कार घोषित झालेले होते परंतु ही मंडळी काही कारणास्तव येऊ शकली नाही त्यात साहित्यिक रमेश वंसकर यांच्या बालागण या बालसाहित्याला डॉ. अनिता तिळवे, विनोद नाईक आदींना फाउंडेशनचे पुरस्कार प्रदान करण्यात आले. प्रागतिक विचारमंचचे अध्यक्ष जयवंत अडपईकर व मंडळातील कार्यकारी पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न करुन यशस्वी केले.