जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । ‘महिला आयोग आपल्या दारी’ या उपक्रमांतर्गत प्राप्त तक्रारीची जनसुनावणी महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी घेतली. यावेळी जिल्हाधिकारी अभिजित राऊत, पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंडे, मुख्य कार्यकारी अधिकारी पंकज आशिया यांची उपस्थिती होती.
श्रीमती चाकणकर म्हणाल्या कि, “राज्य शासन महिला आयोगातर्फे अन्याय अत्याचार प्रतिबंधात्मक उपाय योजनांसाठी समिती कार्यरत आहे, जिल्ह्यात कोविड संसर्ग काळात विधवा, एकल महिलांच्या तसेच पालकत्व गमावलेल्या २० मुलांना ५ लाख रुपये शासन स्तरावरून मदत देण्यात आली. ५६९ महिलांना लाभ देण्यात आला आहे. तसेच अन्य निराधार महिलांना शिलाई मशीन, रेशन लाभ, वृद्धापकाळ पेन्शन आदी. लाभ देण्यात आले आहेत.
जिल्ह्यात २० बालविवाह रोखण्यासाठी कारवाई देखील संबंधित विभागाकडून करण्यात आली. हे कार्य कौतुकास्पद आहे. मात्र सोलापूर येथे ३५० बालविवाह १८ वर्षे वय दाखवून लावून देण्यात आले, यात नोंदणी अधिकारी, उपस्थित असलेले समिती सदस्य यांच्यावर तात्काळ कारवाईचे केली जावी आणि बालविवाह प्रतिबंधक कायदा अमलबजावणी केली जावी अशी शिफारस राज्य महिला आयोगाच्या वतीनं करण्यात आली आहे. असेही त्या म्हणाल्या.
व्हिडीओ लिंक
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/634058544489189