Home Cities जळगाव आसोदेकर लेप्टनंट जनरल जगदीश चौधरी यांना राष्ट्रपतींच्या हस्ते मेडल प्रदान

आसोदेकर लेप्टनंट जनरल जगदीश चौधरी यांना राष्ट्रपतींच्या हस्ते मेडल प्रदान

0
145

नवी दिल्ली-वृत्तसेवा | मुळचे जळगाव तालुक्यातील आसोदे येथील रहिवासी असणारे लेप्टनंट जनरल जगदीश बळीराम चौधरी यांना आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या हस्ते परम विशिष्ट सेवा मेडल प्रदान करून गौरविण्यात आले.

आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांनी सेना दलातील वरिष्ठ अधिकार्‍यांना परम विशिष्ट सेवा मेडल प्रदान करून त्यांच्या कार्याचा गौरव केला. लेप्टनंट जनरल जगदीश बळीराम चौधरी यांचा यात समावेश होता. आपल्या सेवेतील भरीव कार्याबद्दल त्यांचा गौरव करण्यात आला.

जगदीश चौधरी यांचे प्राथमिक शिक्षण आसोद्यात झाले असून त्यांनी पुढील शिक्षण सातारा सैन्य स्कूल व एनडीएमध्ये त्यांनी पुढील शिक्षण घेतले आहे. सन १९८७ पासून ते सैन्यदलात कार्यरत आहेत. यात त्यांनी कॅप्टन, लेफ्टनंट कर्नल, कर्नल, ब्रिगेडीयर या महत्त्वाच्या पदांवर यशस्वीरित्या कार्य केले आहे. विविध पदांवर काम करतांना देश-विदेशात आपल्या कामाची अमिट मोहर उमटवली आहे. सन १९८९मध्ये त्यांनी केलेल्या युद्ध क्षेत्रातील लक्षणीय कामगिरीकरिता सेना मेडल देवून सन्मानित करण्यात आले होते. ययाआधी त्यांना विशिष्ट सेवा मेडलने देखील सन्मानित करण्यात आलेले आहे. यानंतर त्यांना आज परम विशिष्ट सेवा मेडलने गौरवान्वित करण्यात आले आहे.


Protected Content

Play sound