भुसावळ संतोष शेलोडे । भुसावळ शहराच्या विकासकामांना गती देण्यात आली असून या माध्यमातून शहराला प्रगतीपथावर नेण्याची ग्वाही नगराध्यक्ष रमण भोळे यांनी दिली. ते लाईव्ह ट्रेंडला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.
आज झालेल्या भुसावळ नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये विविध १४ विषयांना मंजुरी देण्यात आली. या पार्श्वभूमिवर, नगराध्यक्ष रमण भोळे यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणाले की, भुसावळात गेल्या अनेक वर्षांपासून कामे झाली नसून आता विकासकामांना गती देण्यात आलेली आहे. या माध्यमातून आपले शहर हे स्वच्छ आणि सुंदर करण्यात येणार असल्याची ग्वाहीसुध्दा त्यांनी दिली.
पहा: नगराध्यक्ष रमण भोळे काय म्हणालेत ते !