सूर्योदय मराठी साहित्य संमेलनाची तयारीस प्रारंभ

WhatsApp Image 2019 08 09 at 12.17.36 PM

जळगाव, प्रतिनिधी | शहरातील साहित्य क्षेत्रातील अग्रेसर नोंदणीकृत सूर्योदय सर्वसमावेशक मंडळाच्या १६ व्या वर्धापन दिनानिमीत्त श्री दलुभाऊ जैन चॅरिटेबल ट्रस्ट प्रायोजित एक दिवसीय पंधरावे राज्यस्तरीय सूर्योदय मराठी साहित्य संमेलनाची तयारी सुरू झाली आहे. रविवार दि १८ ऑगस्ट रोजी जळगावी भास्कर मार्केट परिसरातील जैन संघटनेच्या सभागृहात हे संमेलन होणार असल्याचे मंडळाचे अध्यक्ष सतीश जैन यांनी  कळविले आहे.

 

संत साहित्याचे गाढे अभ्यासक प्रख्यात लेखक , ८८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाध्यक्ष , राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष प्रा डॉ. सदानंद मोरे(पुणे) हे या संमेलनाचे अध्यक्षपद भूषवणार आहेत. खानदेशातील नामवंत इतिहासाचे अभ्यासक डॉ. नरसिंह परदेशी हे संमेलनाचे उद्घाटन करणार असून खानदेशातील नामवंत कथा- कादंबरीकार प्रा डॉ. संजीव गिरासे हे संमेलनाच्या समारोपीय सत्राचे अध्यक्षपद भूषवणार आहेत. संमेलनाच्या कालावधीसाठी सभागृहाला केशव तिवारी सभागृह, व्यासपीठाला डॉ. उल्हास कडूसकर व्यासपीठ, परिसराला प्रा. यशवंत पाठक नगर, प्रवेशद्वाराला दिवाकर चौधरी प्रवेशद्वार अशी नावे देण्यात आलेली आहे. संमेलन यशस्वीतेसाठी सचिव डी. बी. महाजन, सल्लागार साहेबराव पाटील, उपाध्यक्ष प्रवीण लोहार यांच्या सह नंदुरबार जिल्हाध्यक्ष प्रा डॉ. माधव कदम , अमळनेर तालुकाध्यक्ष प्रा डॉ. प्रभाकर जोशी , चोपडा तालुकाध्यक्ष अशोक नीलकंठ सोनवणे ,एरंडोल तालुकाध्यक्ष अॅड विलास मोरे, चाळीसगाव तालुकाध्यक्ष जिजाबराव वाघ, धरणगाव तालुकाध्यक्ष धिरज बागुल, पाचोरा तालुकाध्यक्ष विजयसिंग राजपूत, भुसावळ तालुकाध्यक्ष डॉ. जगदीश पाटील , यावल तालुकाध्यक्ष प्रा डॉ. जतीन मेढे, रावेर तालुकाध्यक्ष प्रा. संध्या महाजन, मुक्ताईनगर तालुकाध्यक्ष अ.फ.भालेराव , जामनेर तालुकाध्यक्ष डी. डी. पाटील, भडगाव तालुकाध्यक्ष योगेश ठाकूर , बोदवड तालुकाध्यक्ष प्रा. गणेश सूर्यवंशी, धुळे तालुकाध्यक्ष संजय धनगव्हाळ, साक्री तालुकाध्यक्ष- प्रा डॉ. सतीश मस्के , दोंडाईचा तालुकाध्यक्ष लतिका चौधरी, शिरपूर तालुकाध्यक्ष- यशवंत निकवाडे आदी कामकाज पाहत आहेत.

Protected Content