जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील निवृत्ती नगर मधील केरळी महिला ट्रस्टचे अयप्पा स्वामी मंदीर २६ नोव्हेंबर रोजी खुले करण्यात येणार आहे. २६ नोंव्हेबारपासून कार्तिका पोर्णिमा सूरू होत असल्याने तयारी सूरू करण्यात आली आहे.
संपुर्ण केरळी पध्दतीने बांधलेले हे मंदीर गेल्या २५ वर्षापासून कार्तिकी पोर्णिमेनिमीत्त दर्शनासाठी खुले करण्यात येते. या मंदिरात कार्तिकस्वामी व्यतिरीक्त नवग्रह व इतर देवतांची देखिल मंदीर असून ते वर्षभर दर्शनासाठी खुले असते. या मंदिरात दर्शनासाठी दरवर्षी भाविक दुरदेशातून मोठया प्रमाणात येत असतात. अभिषेक व पूजेसाठी गुरूजीसह स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली असून येत्या २६ नोव्हेंपासून सूरू होत असलेल्या कार्तिकी पौर्णिमा उत्सवाची तयारीला देखिल सूरूवात करण्यात आली. कार्तिक नक्षत्र ११वा.१०सकाळी सुरू होत असून दु. ३ वा ५३ मि. कार्तिक पौर्णिमा सूरू होत आहे. २७ नोव्हेंबर रोजी दु. २ वा १५ मि. समाप्ती होणार आहे. मंदिर दर्शनासाठी २७ नोव्हेंबर पर्यंत खुले करण्यात येणार असून जास्तीत जास्त भाविकांनी दर्शन घ्यावे असे आवाहन केरळी महिला ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी केरळी महिला ट्रस्ट संस्थापक अध्यक्ष श्रीमती अयर यांचेशी ९४०५१४३२३५ या क्रमांकवर संपर्क साधावा.