जळगाव प्रतिनिधी । गेल्या तीन वर्षापासून प्रेम असलेल्या तरुणीच्या कुटुंबियांनी सुरुवातीला लग्नास होकार दर्शविला. मात्र प्रत्यक्षात लग्न करण्याची वेळीच मुलीच्या वडीलांनी लग्न करून देण्यास नकार दिल्याने मुलीच्या वडीलांसमोर प्रियकर तरुणाने उंदीर मारण्याचे औषध प्राशन करुन आत्महत्येचा प्रयत्न केला. प्रियकरानंतर प्रेयसी मुलीनेही औषध प्राशन केले अन् एका रिक्षातून दोघेही स्वतः रुग्णालयात दाखलही झाले. शाहरुख शकील पिंजारी वय 20 असे तरूणाचे नाव असून तरूणी ही अल्पवयीन आहे. दोघांवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
एरंडोल शहरातील म्हसावद नाका, फकीर मोहल्लयात तरुण व तरुणी या दोघांचे एकाच गल्लीत घर आहे. शाहरूख गवंडी काम करतो. तर तरूणी ही शाळा शिकत नसल्याने घरीच राहते. दोघांचे तीन वर्षापासून एकमेकांवर प्रेम आहे. या प्रेमाला शाहरुखच्या कुटुंबियांचा होकार आहे. तरूणीच्या कुटुंबियांकडून त्याला काही हरकत नव्हती. मात्र लग्न करण्याचा निर्णय झाल्यानंतर एैनवेळी तरूणी हीच्या वडीलांनी यु टर्न घेतला. आणि प्रेमाला तसेच लग्नाला विरोध दर्शविला.
लग्नाला विरोध होत असल्याने प्रियकराने सोमवारी दुपारी 2 वाजता मुलीचे घर गाठले. व तिच्या वडीलांना विरोध करण्याबाबत जाब विचारला. मुलीचे वडील तरुणाला मेरी लडकीसे बात करना बंद, मै तेरी उसके साथ शादी नही होने दूँगा असे म्हणाले तर त्यावर उत्तर देत प्रियकर शाहरुख ने मै शादी करुंगा तो आपली लडकीसे करुँगा, नही तो मै मर जाऊंगा, असे म्हणत सोबत आणलेले उंदीर मारण्याचे औषध घेतले. तरूणीनेही त्यापाठोपाठ औषध प्राशन केले. वडीलांसमोर ती शाहरुखसोबत एरंडोल ग्रामीण रुग्णालयात गेली. तेथून त्यांना जिल्हा रुग्णालयात जाण्याचा सल्ला देण्यात आला. सांयकाळी दोघेही जिल्हा रुग्णालयात दाखल झाले असून दोघांवरीही उपचार सुरु आहे. जिल्हा रुग्णालयातील पोलीस चौकीतील पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रदीप बडगुजर व तेजस मराठे या कर्मचार्यांनी शाहरुखचा जबाब नोंदविला असून त्यात घडलेल्या घटनेबाबत नमूद केले आहे.