
यावल –लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । भारतीय जनता पक्षाच्या यावल तालुका कार्यकारिणीत महिला नेतृत्वाला प्रोत्साहन देत डोंगर कठोरा येथील प्रिती नितिन राणे यांची तालुका उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. ही निवड भाजपच्या जळगाव जिल्हा पूर्व विभागाचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत रामधन बाविस्कर यांनी जाहीर केलेल्या नवीन कार्यकारिणीच्या माध्यमातून करण्यात आली असून, यावल तालुक्यातील भाजप महिला कार्यकर्त्यांसाठी ही नियुक्ती प्रेरणादायी ठरत आहे.

प्रिती राणे या सामाजिक कार्यात सक्रीय असून त्यांनी महिला सक्षमीकरण, ग्रामविकास आणि युवतींसाठी विविध उपक्रम राबवले आहेत. पक्ष संघटनातील त्यांच्या सातत्यपूर्ण सहभाग आणि नेतृत्वगुणांची दखल घेत त्यांना पक्षाच्या तालुका कार्यकारिणीत महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यांच्या निवडीनंतर तालुक्यातील महिला कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या निवडीचे आमदार अमोल जावळे, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष शरद महाजन, यावल कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राकेश फेगडे, किसान सेलचे जिल्हा अध्यक्ष नारायण चौधरी, कृउबाचे माजी सभापती व संचालक हर्षल पाटील, यावल पंचायत समितीच्या माजी सभापती पल्लवी पुरूजीत चौधरी, संचालिका कांचन फालक, माजी जिल्हा परिषद सदस्या सविता अतुल भालेराव, माजी तालुका अध्यक्ष व खरेदी विक्री संघाचे संचालक उमेश फेगडे, भाजपाच्या चिटणीस राखी योगराज बऱ्हाटे, तसेच तालुक्यातील ज्येष्ठ कार्यकर्ते हेमराज फेगडे व नितिन महाजन यांनी मनःपूर्वक स्वागत व अभिनंदन केले.
पक्षातील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी प्रिती राणे यांच्या पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या असून, त्यांच्या नेतृत्वात तालुक्यात महिला आणि युवक वर्गाला पक्षाशी अधिकाधिक जोडले जाण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त केला आहे. या निवडीमुळे यावल तालुक्यातील भाजपच्या संघटनात्मक कार्यात महिला सहभागाला नवी दिशा मिळण्याची शक्यता आहे.



