एरंडोल प्रतिनिधी । एरंडोल तालुक्यातील खडके बु येथे एरंडोल तालुका कृषी विभागातर्फे मूग या बियाण्यावर कृषी अधिकारी यांनी शेतकऱ्यांना पेरणी पूर्व बियाणे यावर बीज प्रक्रिया मोहीम राबवून त्यावर शेतकऱ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले.
यावेळी कृषी विभाग कार्यालयाचे कृषी सहाय्यक व्ही.डी.पाटील व सी.बी.जगताप यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की शेतकऱ्यांनी बीज प्रक्रिया कशी व कोणत्या पिकास करावी. शेतकऱ्यांना कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पन्न कसे काढता येईल. यासाठी जमिनीची निगा चांगल्या प्रकारे आपण राखल्यास उत्पन्नात वाढ होते व उत्पन्नावर देखील भर पडते, असे त्यांनी सांगितले. कोरोना महामारीच्या काळात शेतकऱ्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे, असे मार्गदर्शन त्यांनी यावेळी केले. याप्रसंगी खडके बू येथील शेतकरी चुडामन पाटील, सुनील पाटील, विठ्ठल पाठक, भागवत पाटील, सुनील पाटील, सतीश पाटील, राजेंद्र पाटील, प्रवीण पाटील, श्रावण पाटील, जगदिश साळुंखे, नाना पाटील आदी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.