रावेर तहसील कार्यालयात मान्सून पूर्व आढावा बैठक संपन्न

रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | मान्सून पूर्वी तालुक्यात गाव व शहरी भागात नाल्यांची सफाई करावी जीर्ण इमारत असल्यास त्यांना नोटीस द्यावी, रस्त्याने महामार्गने पडाऊ वृक्ष काढून घेण्याच्या सूचना तहसीलदार बंडू कापसे यांनी मान्सून पूर्व आढावा बैठकीत उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या.

रावेर तहसिल कार्यालयात आज मान्सून पूर्व आढावा बैठक तहसीलदार बंडू कापसे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. बैठकीत मान्सूनपूर्व नियोजन व तयारी करण्यासंदर्भात उपस्थित संबंधित अधिकारी यांना सूचना व मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी गट विकास अधिकारी दिपाली कोतवाल मुख्यधिकारी नगर पालिका स्वालिहा मालगावे सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अधिकारी एम पी चौधरी सह पोलिस निरीक्षक आशिष आडसुळ, सहपोलिस निरीक्षक निंभोरा हरिदास बोचरे,भावेश चौधरी,अजय जाधव, स्वप्निल पाटील, अमोल वाघ, पुरूषोत्तम पाटील, विनय कुलकर्णी, डी. व्ही. बाविस्कर पांडुरंग पाटील, मोहनदास महाजन, आर व्ही खैरनार कांतिलाल तायडे आदी रावेर तालुक्यातील सर्व विभागाचे विभाग प्रमुख आणि त्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

Protected Content