जळगाव प्रतिनिधी । मानवाधिकार न्याय जन सेवा ट्रस्ट, नवी दिल्ली उत्तर महाराष्ट्र विभागीय मुख्य प्रवक्तापदी प्रविणकुमार बाविस्कर यांची संस्थापक व राष्ट्रीय कार्याध्यक्ष दिनेश गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच नियुक्ती करण्यात आली असून महाराष्ट्र प्रदेश सचिव अनिल नंन्नवरे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन गौरविण्यात आले आहे.
प्रविणकुमार बाविस्कर हे चोपडा येथील क्रांतिज्योती सावित्रीबाई. फुले न.पा.शाळेत शिक्षक आहेत त्यांना समाजाचे कामासोबतच सामाजिक कार्याची आवड आहे गेल्या वीस ते बाविस वर्षांपासून समाजात जनजागृतीपर अभियान राबवित आहेत तसेच ते अखिल भारतीय कोळी समाजाचे वरिष्ठ कार्यकर्ता आहेत समाजात नेहमी सामाजिक विविध उपक्रम व कार्यक्रम आयोजित करून गरजवंताना सहकार्य करत असतात, शिक्षक भविष्याची पीढी घडवतो त्या उक्तीनुसार त्यांचे विद्यार्थ्यी डॉक्टर, वकील, इंजिनिअर, शिक्षक व राजकारणात सक्रिय आहेत तसेच मोठ मोठ्या पदांवर कार्यरत आहेत,त्यांचेकडे कला अध्यापक शिक्षकांची नाशिक विभागीय अध्यक्ष पदाची जबाबदारी आहे तसेच आदीवासी कोळी समाज समन्वय समितीचे सल्लागार आहेत त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांना उत्तर महाराष्ट्र विभागीय मुख्य प्रवक्ता पदी नियुक्ती करण्यात आली.
यावेळी महाराष्ट्र प्रदेश आई.टी.सेल सचिव डॉ. राजनराम जैसवाल, राष्ट्रीय प्रभारी संजय मेवालाल गुप्ता, प्रदेश सचिव अनिल नंन्नवरे, जळगाव जिल्हा अध्यक्ष सुनिल नंन्नवरे, जिल्हा युवक अध्यक्ष धनराज साळूंके, जिल्हा उपाध्यक्ष योगेश बाविस्कर, राजेंद्र चौधरी, सचिव ज्ञानेश्वर पाटील, जळगाव महानगर प्रमुख किरण भावसार, जिल्हा युवक उपाध्यक्ष राहूल निकुंभ व मानवाधिकार न्याय जन सेवा ट्रस्ट चे पदाधिकारी उपस्थित होते.
प्रविणकुमार बाविस्कर यांचे निवडीचे परेशभाई कोळी, राज्य युवा अध्यक्ष, अखिल भारतीय कोळी समाज, ॲड. शरदचंद्र जाधव, मुख्य समन्वयक, आदीवासी कोळी समाज समन्वय समिती महाराष्ट्र राज्य, ॲड. पी.सी.चौधरी, उत्तर महाराष्ट्र विभागीय विधी सलाहकार, महीला पदाधिकारी डाॅ.रूचिता धनगर, मंगलाताई सोनवणे, वर्षाताई बाविस्कर, जिल्हा महीला सल्लागार, ॲड. शोभाताई खैरनार, उत्तर महाराष्ट्र प्रभारी तथा धुळे जिल्हा अध्यक्ष हिरालालभाऊ वाकडे, बांभोरी(प्र.चां.)उपसपंच भिकन नंन्नवरे, गोपालशेठ नंन्नवरे, रवीशेठ नंन्नवरे, अनिल शेठ नंन्नवरे, ॲड. विशाल घोडेस्वार, रोहन पराये, नंदकिशोर जगताप, आकाश पाटील आदींसह अभिनंदन केले.