जळगाव प्रतिनिधी । अतिमद्यप्राशनाने प्रकृती अस्वास्थ्यामुळे जिल्हा रुग्णालयात उपचार घेत असलेल्या अनिल हिम्मत ठाकरे वय 45 रा शिवकॉलनी यांचा शुक्रवारी सकाळी 4.45 वाजता मृत्यू झाला आहे. याबाबत शून्य क्रमांकाने शनिपेठ पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शिवकॉलनी येथील अनिल हिम्मत ठाकरे यांना दारुचे व्यसन आहे. व्यसनामुळे अचानक प्रकृती बिघडल्याने त्यांना कुटुंबियांनी 2 जून रोजी जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले होते. उपचार सुरु असतांना 7 रोजी पहाटे 4.45 वाजेच्या सुमारास त्यांना अचानक रक्ताच्या उलट्या झाल्या, यानंतर झटके आले, डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न केले अनिल ठाकरे यांची प्राणज्योत मालवली. याबाबत जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रविण पाटील यांच्या खबरीवरुन अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. प्राथमिक तपास गिरीश पाटील हे करीत आहेत.