
बीड (वृत्तसंस्था) खासदार प्रीतम मुंडे यांच्या उमेदवारीवर आक्षेप घेणाऱ्या काँग्रेस कार्यकर्त्याला बेदम मारहाण केल्याची घटना बीडमध्ये घडली. या घटनेमुळे शहरात प्रचंड खळबळ उडाली आहे.

काँग्रेस कार्यकर्ते दादासाहेब मुंडे यांनी खासदार प्रीतम मुंडे यांच्या लोकसभा उमेदवारी अर्जावर आक्षेप नोंदवला होता. त्याबाबत दादासाहेब यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे तक्रारदेखील केली. परंतु या तक्रारीनंतर पंकजा मुंडे समर्थकांनी दादासाहेब यांना जबर मारहाण केली आहे. काँग्रेस कार्यकर्ते दादासाहेब मुंडे यांनी प्रीतम मुंडे यांच्या लोकसभा उमेदवारीवर आक्षेप घेत निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे तक्रार दाखल केली. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच पंकजा मुंडे समर्थकांनी दादासाहेब मुंडे यांना मारहाण केली. दादासाहेब मुंडे हे गोपीनाथ मुंडे यांचे विश्वासू कार्यकर्ते म्हणून पूर्वी ओळखले जात होते.


