नवी दिल्ली वृत्तसंस्था । माजी राष्ट्रपती सौ. प्रतिभाताई पाटील यांना मेक्सिकन सरकारने ऑर्डर ऑफ अॅजटेक ईगल या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित करण्याची घोषणा केली आहे.
मेक्सिको देशामध्ये आर्डेन मेक्सिकाना डेल एक्वेला अॅजटेका म्हणजेच ऑर्डर ऑफ अॅजटेक ईगल हा सर्वोच्च पुरस्कार मानला जातो. यंदाचा हा पुरस्कार भारताच्या माजी राष्ट्रपती सौ. प्रतिभाताई पाटील यांना जाहीर करण्यात आला आहे. यापूर्वी देशाचे माजी राष्ट्रपती एस. राधाकृष्णन यांना या पुरस्काराने गौरविण्यात आले होते. यानंतर त्या याने गौरवान्वित होणार्या देशाच्या दुसर्या राष्ट्रपती बनल्या आहेत. तर उर्वरित भारतीयांमध्ये नोबेल विजेते अमर्त्य सेन, कलावंत सतीश गुजराल आदींनाही हा पुरस्कार मिळालेला आहे.
सौ. प्रतिभाताई पाटील यांना मेक्सिकोच्या राजदूतांच्या हस्ते या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार असल्याचे आज जाहीर करण्यात आले आहे.