Home Cities भडगाव प्रतापराव पाटील कन्येसह भाजपमध्ये दाखल !

प्रतापराव पाटील कन्येसह भाजपमध्ये दाखल !

0
236


भडगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | शैक्षणिक, सहकार, सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवर व्यक्तीमत्व म्हणून ओळखले जाणारे प्रतापराव हरी पाटील यांनी आज आपल्या कन्येसह भारतीय जनता पक्षात प्रवेश घेतला असून यामुळे पाचोरा-भडगाव मतदारसंघात भाजपने पुन्हा एका मातब्बर नेत्याला आपल्याकडे घेतल्याचे मानले जात आहे.

अलीकडेच माजी आमदार दिलीप वाघ व शिवसेना-उबाठा पक्षाच्या नेत्या तथा गत विधानसभा निवडणुकीतील उमेदवार वैशाली सुर्यवंशी यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश घेतला होता. यानंतर आता मतदारसंघातील एक दिग्गज नेते म्हणून गणले जाणारे प्रतापराव हरी पाटील हे देखील भाजपमध्ये दाखल झाले आहेत. त्यांनी आज जलसंपदा मंत्री ना. गिरीशभाऊ महाजन यांच्या निवासस्थानी आपली कन्या पूनम पाटील यांच्यासह भाजपमध्ये प्रवेश घेतला.

या प्रवेश सोहळ्याला आमदार मंगेश चव्हाण, माजी आमदार दिलीप वाघ, दुध संघाचे संचालक रोहित निकम, अमोल शिंदे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. प्रतापराव हरी पाटील यांच्यामुळे पाचोरा-भडगाव मतदारसंघात भाजपची स्थिती अजून बळकट झाली आहे. विशेष करून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपला याचा लाभ होईल असे मानले जात आहे.


Protected Content

Play sound