नांदेड-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | काँग्रेस खासदार वसंतराव चव्हाण यांच्या अकाली निधनामुळे लोकसभेच्या नांदेड मतदारसंघात नजीकच्या काळात होणाऱ्या पोटनिवडणुकीत भाजपाकडे बरेच पर्याय असले, तरी दोन महिन्यांपूर्वी पराभूत झालेले माजी खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी पक्षाच्या उमेदवारीवर आपला दावा जाहीर केला आहे.
छत्रपती संभाजीनगरात रविवारी नंदिग्राम मित्रमंडळाच्या माध्यमातून एक मेळावा पार पडला. या मेळाव्यात बोलताना चिखलीकर यांनी भाजपा नेते, माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्यासमोरच लोकसभेची निवडणूक पुन्हा लढविण्याची तयारी दर्शविली.