जळगाव प्रतिनिधी । प्रसुती झाल्यानंतर अत्यवस्थ झालेल्या विवाहितेचा आज दुपारी 2 वाजेच्या सुमारास उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली. याबाबत जिल्हा पेठ पोलीसात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, माया शिवराम सोनवणे (वय-20) रा. हुडको, पिंप्राळा गर्भवती महिला बाळंपणासाठी माहेरी दोनगाव ता.धरणगाव येथे गेल्या होता. रविवार प्रसुतीकळा जाणवायला लागल्याने त्यांना तातडीने जिल्हा वैद्यकिय महाविद्यालयात दाखल केले. सकाळी 9 वाजता बाळाला जन्म दिला. मात्र बाळ थोड्यावेळाने दगावले. त्यांची प्रकृती अधिक खालावल्याने अतिदक्षता विभागात दाखल केले. आज दुपारी 2 वाजेच्या सुमारास उपचारादरम्यान मृत्यू झाला. याबाबत जिल्हा पेठ पोलीसात वैद्यकिय अधिकारी डॉ. रविंद्र नारखेडे यांच्या खबरीवरून आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. प्राथमिक तपास पीएसआय मनोज सुरवाडे आणि पोहेकॉ विनोद पाटील हे करीत आहे.