Home क्राईम दुहेरी हत्याकांड प्रकरणात प्रमोद सावकारे यांना धमकी !

दुहेरी हत्याकांड प्रकरणात प्रमोद सावकारे यांना धमकी !

0
146

भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | येथील दुहेरी हत्याकांड झाल्यानंतर बारसे कुटुंबाकडे सांत्वनासाठी गेल्यानंतर आमदार संजय सावकारे यांचे बंधू प्रमोद सावकारे यांना मोबाईलवरून धमकी देण्यात आल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या संदर्भातील माहिती अशी की, भुसावळ शहर आणि परिसर माजी नगरसेवक संतोष बारसे आणि सामाजिक कार्यकर्ते सुनील राखुंडे यांच्या खुनामुळे हादरला आहे. त्यांच्या पार्थिवावर अतिशय शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यानंतर अनेक मान्यवर हे बारसे कुटुंबाचे सांत्वन करण्यासाठी जात आहेत. या अनुषंगाने सामाजिक कार्यकर्ते तथा आमदारांचे बंधू ्तथा कॉटन सेलचे संचालक प्रमोद सावकारे हे शनिवारी बारसे कुटुंबाचे सांत्वन करण्यासाठी गेले होते.

यानंतर दुपारी १ वाजून ३८ मिनिटांनी त्यांना अनोळखी क्रमांकावरून कॉल आला. यात तुम्ही या प्रकरणात पडू नका, अन्यथा आम्ही तुम्हालाही ठार करू ! अशी धमकी देण्यात आली. याच क्रमांकावरून त्यांना सात ते आठ कॉल आले. यामुळे प्रमोद सावकारे यांनी बाजारपेठ पोलीस स्थानकात फिर्याद दिल्यावरून अनोळखी व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर, या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.


Protected Content

Play sound