आंबेडकरी व्हाईस मिडीया फोरमच्या उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदी प्रकाश तायडे

भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । देशासह राज्यभरातील आंबेडकरी पत्रकार समुहाच्या न्याय हक्कासाठी स्थापन झालेल्या ‘आंबेडकरी व्हाईस मिडीया फोरमची महत्वाची वार्षिक आढावा बैठक शेगाव नुकतीच पार पडली. यावेळी भुसावळ येथील पत्रकार प्रकाश तायडे यांची आंबेडकरी व्हाईस मिडिया फोरम च्या उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदी निवड झाली.

केंद्रीय अध्यक्ष उत्तम वानखेडे यांच्याहस्ते नियुक्ती पत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी केंद्रीय महासचिव प्रकाश सरदार, प्रदेशाध्यक्ष महेद्र सावंग ,देवचंद्र सम्दुर, भाई सिद्धार्थ पैठने, पंडीत परघरमोर यांची प्रमुख उपस्थिती होती. येत्या ३१ जानेवारी रोजी शेगाव जि. बुलडाणा येथे ‘मूकनायक’ सन्मान व पत्रकार दिन साजरा करण्याचा प्रस्ताव एकमताने मंजुर करण्यात आला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यापर्ण करुन त्रिशरण पंचशिल घेण्यात आले.तसेच मागील वर्षी संघटनेची स्थापना झालेली असुन संघटनेत राज्यभरातील ३००च्या वर बौद्ध पत्रकार सभासद संख्या असुन दररोज नविन सदस्य नोंदणी केली जात आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १९२० साली सुरु केलेल्या मूकनायक वर्तमानपत्राचा सन्मान व मानवंदना म्हणुन भव्य ‘मूकनायक’ सन्मान पत्रकार दिन साजरा करण्याबाबत सविस्तर चर्चा व मार्गदर्शन करण्यात आले .सदर कार्यक्रमाला वंचित बहुजन आघाडी चे सुजातदादा आंबेडकर यांना प्रमुख मार्गदर्शक म्हणून निमंत्रित करण्याचा एकमुखी ठराव मंजुर करण्यात आला. तर सुजातदादानींही आमंत्रण स्विकारले असल्याची माहीती देण्यात आली. यावेळी पत्रकार शितल शेगोकार, राजेश तायडे, दिनेश इखारे यांना ही नियुक्तीपत्र देण्यात आले.

Protected Content