मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटातील प्रमुख नेते छगन भुजबळ यांना खुली ऑफर दिली आहे. ‘भुजबळ यांनी आमच्याबरोबर यावं”, असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे. ‘छगन भुजबळ हे शंभर टक्के ओबीसीवादी नेते आहेत आणि त्यांनी आमच्याबरोबर यावं असं आम्हाला वाटते’, असेही आंबेडकर म्हणाले. छगन भुजबळ यांनी ओबीसी आरक्षणाचा मुद्दा लावून धरला आहे.
प्रकाश आंबेडकर म्हणाले, ‘मी तर वाट पाहतोय, त्यांनी राष्ट्रवादीच्या अजित पवार गटातून बाहेर पडावे आणि आमच्याबरोबर यावे. भुजबळ हे शंभर टक्के ओबीसीवादी नेते आहेत. पण त्यांचा पक्ष ओबीसीवादी आहे का याचा खुलासा केवळ भुजबळच करू शकतात. यावर दुसरे कोणीही बोलू शकत नाही. आम्हाला असे वाटत की त्यांनी आमच्याबरोबर यावे’.
प्रकाश आंबेडकर यांनी मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीलाही वंचितबरोबर येण्याचे आवाहन केले आहे. राज्यात सध्या महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा संघर्ष चालू आहे. अशातच प्रकाश आंबेडकर महाराष्ट्रात तिसऱ्या आघाडीची निर्मिती करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे चित्र आहे. यात त्यांनी माकपला त्यांच्याबरोबर येण्याचे आवाहन केले. आहे.