Home Cities भुसावळ वरणगावात प्रवीण दरेकर यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन

वरणगावात प्रवीण दरेकर यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन

0
47

वरणगाव प्रतिनिधी । भाजपचे विधान परिषद विरोधी पक्षनेता प्रविण दरेकर यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष तसेच महिलांबद्दल अपमानास्पद व आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने त्याच्या निषेधार्थ आज राष्ट्रवादी कॉंग्रेस महिला आघाडीतर्फे वरणगाव शहरातील बस स्टँड चौकात दरेकर यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करण्यात आले. यावेळी जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली.

विधान परीषदेचे विरोधी पक्ष नेता भाजप यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष हा रंगलेल्या गालांचा मुका घेणारा पक्ष आहे. अशाप्रकारे पक्षाचा तसेच महिलांचा अपमान करणारे आक्षेपार्ह वक्तव्य केले होते.  दरेकर यांच्या वक्तव्याचा निषेध म्हणून भुसावळ तालुक्यातील वरणगाव राष्ट्रवादी कॉग्रेंस महिला आघाडीतर्फे बस स्टँड चौकात दरेकरांच्या फोटोवर  जोडे मारो आंदोलन करण्यात आले. प्रवीण दरेकर मुर्दाबाद, भाजपचा निषेध असो, दरेकरांचा निषेध असो, महिलांचा अपमान करणार्‍यांचा निषेध असो, दरेकरांचे करायचे काय, खाली डोक वरती पाय अशा पध्दतीने जोरदार घोषणाबाजीही यावेळी करण्यात आली.

 


Protected Content

Play sound