अमरावती-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा |महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा उलथापालथ होण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीत महायुतीची सोडत आपला उमेदवार उभा करणाऱ्या प्रहार संघटनेचे बच्चू कडू यांनी विधानसभा निव़डणुकीसाठीही एकला चलोची भूमिका घेतली आहे. विधानसभेला वेगळं होऊन लढण्याच्या निर्णयाने बच्चू कडू यांनी महायुतीचे टेन्शन वाढवली आहे. प्रहार जनशक्ती संघटनेचे नेते बच्चू कडू महायुतीतून बाहरे पडणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. कारण विधानसभा निवडणुकीत २० जागा स्वबळावर लढण्याचा निर्णय बच्चू कडू यांनी जाहीर केला आहे.
प्रहार जनशक्ती पक्षाची उद्या (गुरुवार) बैठक बोलाविण्यात आली असून त्यामध्ये स्वबळावर लढण्याचा निर्णय होणार आहे. आज पत्रकारांशी बोलताना बच्चू कडू म्हणाले की, लोकसभेला बच्चू कडू यांना सोबत का घेतले नाही, हा प्रश्न मला विचारण्यापेक्षा त्यांना विचारा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळ्याच्या निमंत्रणाची मी वाट पाहिली नाही. एनडीएकडून एक-एक पाऊल पडत आहे. ते आमच्यादृष्टीने सोईचे पडत आहे.
आम्ही सोबत राहून त्यांना मदत केली. पण एका वर्षात त्याचे परिणाम आम्हाला भोगावे लागले आहेत. दोन दिवसात पुढील निर्णय घेतला जाईल. महायुतीत राहिल्यानंतरही २० जागा लढवणार का? यावर बच्चू कडू म्हणाले की, महायुतीत राहिलो तर याचा अर्थ असा नाही की, आम्ही निवडणूक लढवू नये. एक राजकीय पक्ष म्हणून आम्हाला निवडणूक लढवावीच लागेल, निवडणूक लढवणं हा कोणत्याही राजकीय पक्षाचा मुख्य उद्देश असतो.दरम्यान, आम्ही लढणार असेल २० जागा या केवळ विदर्भातल्या नसतील तर संपूर्ण महाराष्ट्रातील असतील. तसेच कडू म्हणाले की, मंत्रिमंडळ विस्ताराबाबतही त्यांनी भाष्य केलं. मंत्रिमंडळ विस्तार झाला, तरी मला मंत्रीपद मिळणार नाही आणि त्यांनी मला मंत्रिपद दिलं, तरी मी ते घेणार नाही, असे बच्चू कडू म्हणाले.
जरांगे पाटील यांचे उपोषण सुरू असून त्यांची प्रकृती खालावत आहे. त्यांची समाजाला गरज आहे. त्यांनी जास्तीत जास्त आमदार निवडून आणण्याच्या तयारीला लागावे. त्यांनी आता आंदोलन करू नये, उपोषण मागे घ्यावे, अशी विनंती बच्ची कडू यांनी केली. भाजपला अन्य पक्षांच्या मदतीशिवाय केंद्रात सरकार स्थापन करता आले नसते, त्यामुळे एका व्यक्तीच्या राजवटीचे दिवस संपले आहेत, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजप व पंतप्रधान मोदींवर केली. केंद्रात युतीचे सरकार आल्याने मोदी गॅरंटी आता संपुष्टात आली असून मतदारांच्या ताकदीमुळे हा बदल शक्य झाला आहे. लोकसभा मतदारसंघातील पुरंदर तालुक्यात पाणीटंचाईपरिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आलेल्या शरद पवार यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला.