यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | प्रहार दिव्यांग क्रांती संघटना यावल येथील पंचायत समिती व नगर परिषद येथे विविध मागण्यांसाठी निवेदन देण्यात आले त्यात पंचायत समिती मध्ये रॅम बसवणे व नगरपालिकामध्ये रॅम बसवणे, नगरपालिका तसेच ग्रामीण भागातील ग्रामपंचायत मध्ये ५० टक्के घरपट्टीमध्ये सवलत देण्यात यावी. दिव्यांगांसाठी दिव्यांग हॉल व गार्डनची निर्मिती करण्यात यावी अशा आशयाच्या मागण्याच्या बाबतीत निवेदन देण्यात आले आहे.
निवेदन देताना प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेचे यावल तालुका अध्यक्ष प्रवीण सोनवणे, तालुका उपाध्यक्ष जनार्दन फेगडे, मिथुन सावखेडकर, दिलीप चौधरी, दिलीप आमोदकर, उत्तम कानडे, प्रदीप माळी,शशिकांत वारुडकर, महिला आघाडीचे अध्यक्ष खुशबू चौधरी, उपाध्यक्ष सरला तायडे,मंगला बारी, गीतांजली वरुडकर तसेच दिव्यांग बांधव असीम शेख , शब्बीर खान रफिक, भगवान माळी, किरण सुरवाडे ,दिनकर चौधरी, नलनी चौधरी, सिकंदर पटेल,शेख अस्लम शेख हमीद, चंद्रकांत बावस्कर शाहरुख पटेल, शेख इस्माईल,शेख वजीर, फिरोज पटेल असे मोठ्या संख्येने दिव्यांग बांधव व भगिनी उपस्थित होत्या.