प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्या शपथविधीदरम्यान विरोधकांचा गोंधळ

Sadhvi Pragya

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) लोकसभेच्या अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे. नवनिर्वाचित भाजपाच्या वादग्रस्त खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी शपथ घ्यायला सुरुवात करताच विरोधकांनी जोरदार गोंधळ घातला. दरम्यान, गोंधळलेल्या प्रज्ञा सिंह यांना तिसऱ्यांदा शपथ घेण्याची संधी दिल्यानंतर त्यांचा शपथविधी पूर्ण झाला.

 

मी साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर स्वामी पूर्णचेतनानंद अवधेशानंद गिरी, असा नामोल्लेख प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी केला होता. त्यानंतर विरोधकांनी आक्षेप घेतला. त्यानंतर प्रज्ञा सिंह यांनी आपला शपथविधी थांबवला. त्यानंतर लोकसभेत उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांनी त्यांना शपथेदरम्यान वडिलांचे नावही घेण्यास सांगितले. त्यानंतर प्रज्ञा सिंह यांनी दुसऱ्यांदा शपथ घेतानाही गोंधळ झाला. अखेरीस विरोधी पक्षांच्या सदस्यांना आवरत प्रोटेम स्पीकर यांनी प्रज्ञा सिंह ठाकूर यांना तिसऱ्यांदा शपथ घेण्याची संधी दिली. त्यानंतर त्यांचा शपथविधी पूर्ण झाला. दरम्यान, प्रज्ञा सिंह या संस्कृत भाषेत शपथ घेत होत्या. त्यांनी संस्कृतमध्ये आपले नाव उच्चारताच विरोधी पक्षांकडून विरोधात सुरुवात झाली. प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी शपथ घेताना केवळ स्वत:चे नाव घ्यावे, अशी मागणी विरोधकांनी केली.

Protected Content