उद्या देशभरातील डॉक्टरांचा संप

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | कोलकात्यातील आरजी कर वैद्यकीय महाविद्यालयात शिकणा-या एका महिला डॉक्टरवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली. या घटनेने संपूर्ण देश हादरला. पोलिसांनी आरोपीला अटक केली. पण डॉक्टर, आरोग्य सेवा संबंधित इतर कर्मचारी या घटनेनंतर आक्रमक झाले आहेत. डॉक्टरांच्या सुरक्षेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यामुळे देशभरातून डॉक्टरांच्या सुरक्षेबाबत अनेक मागण्या केल्या जात आहेत.

दरम्यान, याच पार्श्वभूमीवर इंडियन मेडिकल असोसिएशनने शनिवारी, १७ ऑगस्टला देशव्यापी संप पुकारला आहे. कोलकाता आरजी कर वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टर महिलेवर झालेल्या अत्याचार आणि हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ आयएमएने संप पुकारला आहे. १७ ऑगस्ट रोजी ६ ते १८ ऑगस्ट रोजी सकाळी ६ वाजेपर्यंत सर्व दवाखाने, डॉक्टरांचे क्लिनिक, ओपीडीच्या सेवा बंद ठेवण्यात येणार आहेत. पण, यावेळी रुग्णालयांमधील अत्यावश्यक सेवा सुरू राहणार असल्याची माहिती आयएमएने दिली आहे.

या संपामुळे देशातील वैद्यकीय सेवेवर याचा मोठा परिणाम दिसून येणार आहे. आयएमएने एक पत्रक जारी करत या संपाबद्दल माहिती दिली आहे. यामध्ये नमूद केले आहे की, या संपादरम्यान सर्व दवाखाने, डॉक्टरांचे क्लिनिक, ओपीडीच्या सेवा या १७ ऑगस्ट रोजी सकाळी ६ ते १८ ऑगस्ट रोजी सकाळी ६ वाजेपर्यंत असा तब्बल २४ तास बंद पुकारण्यात आला आहे. पण, यावेळी रुग्णालयांमधील अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहेत. आयसीयू, अपघात विभाग आणि प्रसूती सेवा या संपादरम्यान सुरू असणार असल्याचे या पत्रातून स्पष्ट करण्यात आले आहे.

Protected Content