
सावदा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अयोध्या येथील प्रभू श्रीराम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा वर्धापन दिनाचा उत्साहात सोहळा सावद्याच्या डॉ. उल्हास पाटील सीबीएसई इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये साजरा करण्यात आला.


आपल्या देशात अनेक अध्यात्मिक, सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरा आहेत, आणि म्हणूनच भारत देश महान आहे. अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला २२ जानेवारी २०२५ रोजी एक वर्ष पूर्ण झाले. या पवित्र प्रसंगाच्या निमित्ताने सावदा येथील डॉ. उल्हास पाटील इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये विशेष पूजा व धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी शाळेच्या प्रिन्सिपल, भारती महाजन यांच्या हस्ते प्रभू श्रीरामांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. शिक्षिका दिपाली धांडे यांनी प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाचे महत्त्व विद्यार्थ्यांना सांगितले. त्यानंतर इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांनी आणि संस्कृत शिक्षिका वर्षा नेहते यांनी राम रक्षा स्तोत्राचे वाचन केले. यावेळी विद्यार्थ्यांना अध्यात्मिक मूल्यांचे महत्त्व समजावून सांगण्यात आले. या धार्मिक कार्यक्रमात शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आणि परिश्रम घेतले. या कार्यक्रमाद्वारे शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये अध्यात्मिक वातावरण तयार करण्यात आले, ज्यामुळे त्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडू शकतील. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेच्या प्रिन्सीपल भारती महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले


