Home Cities एरंडोल अंतुर्ली येथे शाळेच्या पहिल्या दिवशी गावात प्रभातफेरी

अंतुर्ली येथे शाळेच्या पहिल्या दिवशी गावात प्रभातफेरी

a401e784 0739 4f25 89cc 37f8b5934195
a401e784 0739 4f25 89cc 37f8b5934195

a401e784 0739 4f25 89cc 37f8b5934195

कासोदा ता.एरंडोल (वार्ताहर) येथून जवळच असलेल्या अंतुर्ली खु.ता एरंडोल येथील जि.प शाळेत विद्यार्थांचा प्रवेशोत्सवाचा कार्यक्रम सोमवारी मोठ्या उत्साहात पार पडला.

 

जि.प.प्राथमिक शाळेत उपस्थित राहण्यासाठी व विद्यार्थ्यांनचे मनोबल वाढविण्यासाठी शाळेमार्फत गावातून वाद्यासह प्रभात फेरी काढण्यात आली. यावेळी विविध घोषणा देखील देण्यात आल्या. शाळेत पहिल्याच दिवशीच मान्यवरांच्या हस्ते मोफत शालेय पाठ्यपुस्तकाचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी शाळा व्यवस्थापन समिति ,सदस्य,पालक, मुख्यध्यपक श्री.वारे, श्री.सपकाळे, दत्ताञय पाटील, जि. प. शाळेचे विध्यार्थी-विद्यार्थीनींसह समस्त ग्रामस्थ व महाराणा प्रताप युवा मंचचे पदाधिकारी उपस्थितीत होते.


Protected Content

Play sound