
पाचोरा (प्रतिनीधी) येथील हनुमान नगरमधील रहिवाशी प्रभाकर श्रावण सोनवणे (वय ६९) यांचे आज पहाटे तीन वाजेच्या सुमारास अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.
पाचोरा तालुक्यातिल बाळद येथील मुळचे रहिवाशी असलेले प्रभाकर सोनवणे हे सेवानिवृत्त रेल्वे कर्मचारी होते. ते तलाठी प्रेमदास सोनवणे व दै. पुण्यनगरीचे पञकार भास्कर सोनवणे यांचे ते मोठे बंधु होत. त्यांच्या पश्चात तीन भाऊ,एक बहिण, दोन मुले,एक मुलगी,जावई,सुना नातवंडे असा मोठा परीवार आहे. त्यांची अंतयाञा आज सायंकाळी ६ वाजता वाजता हनुमान नगर येथील राहत्या घरून निघणार आहे.