पुणे (वृत्तसंस्था ) देशांत लोकसभा निवडणुकी प्रचारादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रचाराची पातळी लक्षात घेता मतदारांनी संतुलन बिघडलेल्या व्यक्तीला पंतप्रधान पदावर बसवू नये, अशा शब्दांत वंचित बहुजन विकास आघाडीचे समन्वयक प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली.
महात्मा बसवेश्वर जयंतीनिमित्त पुण्यातील गंज पेठ येथे अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेला आंबेडकर यांनी उपस्थित नागरिकांना मार्गदर्शन केले. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी राज्यातील अनेक घडामोडींवर भाष्य केले. आंबेडकर म्हणाले, निवडणुकीनंतर भारतीय जनता पार्टी सत्तेत येणार नाही. तसेच देवेगौडांसारखी एखादी व्यक्ती पंतप्रधान होऊ शकते. या निवडणुकीत राज्याबाबत काय निकाल लागतील हे सट्टा बाजारालाही सांगता येईना तर मी काय सांगणार. या निवडणुकीत मान्यता प्राप्त पार्टी होऊ इतक्या जागा वंचित बहुजन आघाडीला मिळतील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.